Picsart 25 03 05 15 53 43 796

सैनिकी सेवेची कास धरा – स्वप्न उंच ठेवा!

कॅप्टन चंद्रशेखर वारळकर,

शत्रूजीत अकॅडमीचे डायरेक्टर यांना 25 वर्षांचा संरक्षण क्षेत्रात आणि NDA CDS AFCAT SSB प्रशिक्षणाचा अनुभव आहे. त्यांनी भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्या साठी 1 लाखा पेक्षा जास्त मुलांना मार्गदर्शन केले आहेत.

10 वी / 11 वी / 12 वी आणि SY / TY / Engineering Passed & Appearing मुल आणि मुलींसाठी कॅप्टन चंद्रशेखर वारळकर ह्यांच एक महत्त्वपूर्ण संदेश.

 
माझ्या मराठी तरुणांनो,
सैन्य दलात अधिकारी होणे हा फक्त एक करिअर नाही, तर ती एक जबाबदारी, ती एक प्रतिष्ठा आहे.
आज तुमच्याशी मी एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत नव्हे, तर तुमच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत बोलतोय.
 

१. तुमच्या रक्तातच आहे शौर्य!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची परंपरा आपल्याला लाभली आहे. मराठ्यांच्या तलवारीने इतिहास घडवला, आणि आज आपल्या बुद्धीने आपण भविष्यातील सैनिकी नेतृत्व घडवू शकतो!
 

२. सुरक्षित भविष्य, सर्वोच्च सन्मान

आज अनेक जण चांगल्या पगाराच्या नोकऱ्या शोधतायत, पण एक अधिकारी म्हणून तुम्हाला केवळ पैसा नाही, तर एक अमूल्य ओळख मिळते – मान, सन्मान आणि जबाबदारी!
 

३. ध्येय ठरवा, वाटचाल करा!

“जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही!” हे स्वामी विवेकानंदांचे विचार पक्के ठेवा. सैनिक होणे सोपे नाही, पण अशक्यही नाही. मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाने तुम्हीही गणवेष परिधान करू शकता.
 

४. जबाबदारीची जाणीव ठेवा

सैन्य हे केवळ हत्यार उचलण्याचे नाव नाही, ते देशाचे संरक्षण, नेतृत्व आणि कर्तव्य आहे. एक अधिकारी म्हणून तुम्ही केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी उभे राहता!
 

५. आता कृतीची वेळ!

“शब्द नाही, तर कृती बोलली पाहिजे!” – आता निर्णय घ्या, सराव सुरू करा, आणि NDA, CDS, AFCAT परीक्षांसाठी तयारीला लागा!
 
“सिंहाची चाल आणि अधिकारी बनण्याची जिद्द कधीच थांबत नाही!”
 

जय हिंद! जय महाराष्ट्र!